जास्तीचा फायदा

जास्त माइलेज

TVS Jupiter ETFi

ETFi

नवीन BS-VI ला साजेसे असे बनवलेले नेक्स्ट-जेन इको थ्रस्ट फ्युअल इंजेक्शन (ETFi) इंजिन जे 15% जास्त माइलेजसह उत्कृष्ट इंजिन परफॉर्मन्स, उत्तम टिकाऊपणा आणि राइडचा उत्तम अनुभव देते

TVS Jupiter ZX More Mileage

15% जास्त माइलेज

इको थ्रस्ट फ्युअल इंजेक्शन टेक्नॉलॉजी सोबत तुम्हाला 15% जास्त माइलेज मिळते

इकोनोमीटर®

TVS Jupiter उत्कृष्ट इंधन किफायतीसाठी कौशल्याने डिझाइन केलेली आहे. आणि तुमच्या थोड्याशा मदतीने, ही आणखीनच उत्कृष्ट बनू शकते. आधुनिक टेक्नोलॉजी केवळ श्रेणीमध्ये सर्वश्रेष्ठ माइलेज मिळवण्याचा एक हिस्सा आहे. बस तुमचे थ्रॉटल "इकोनॉमी" मोड मध्ये ॲडजस्ट करा आणि जास्तीत जास्त इंधन वाचवा. "पॉवर" आणि "इको" सारखा टू-मोड रायडिंग विकल्प, TVS Jupiter चालवण्याचा तुमचा अनुभव थोडा आणखी मजेदार बनवतो

इंटीलिजंट इग्निशन सिस्टिम

TVS Jupiter ची उत्कृष्ट इग्निशन टेक्नॉलॉजी वाहनावरील भार आणि पावरची गरज ह्यांचा सातत्याने वेध घेऊन राइची उत्तम क्वालिटी आणि ट्रॅफिकमध्ये अधिक चांगले माइलेज खात्रीने मिळण्यासाठी तिचे रिस्पॉन्स ॲडजस्ट करते. परिणामी फ्युअल एफिशियन्सी सुधारते, संबंधित श्रेणीतील सर्वोत्तम माइलेज मिळते आणि पैशाचीही बचत होते

जास्त स्टाइल

TVS Jupiter Classic LED Headlamp

LED हेड लॅम्प

खराब व्हिजिबिलिटी वर मात आणि अतुलनीय स्टाइल ! LED हेड लॅम्प तुमची सुरक्षा सुनिश्चित करतात, जेव्हा तुम्ही भल्या पहाटे किंवा संध्याकाळी, धुक्याने भरलेले हवामान किंवा मुसळधार पावसाच्या वेळी गाडी चालवत असता, जेव्हा व्हिजिबिलिटी पुरेशी नसते

आधुनिक डिझाइन आणि ब्लॅक बॅजेस​

स्टाइलमध्ये सर्वात पुढे, TVS Jupiter मध्ये आहे एक 3D एम्ब्लेम, जो एक प्रीमियम टू-व्हीलरची भावना देतो

स्टेनलेस स्टील मफलर गार्ड

TVS Jupiter मध्ये स्टाइल आणि सुरक्षेचे अतुलनीय संयोजन आहे, ज्याच्या सोबत आहे स्टेनलेस स्टील मफलर गार्ड, ज्याच्यात आहे ग्लॉसी मिरर सारखी जगमगणारी चमक

टिंटेड वायझर

स्टायलिश टिंटेड विंडशील्ड, मोहक राउंड-शेप्ड फुल क्रोम मिरर्ससह

मॉडर्न क्लासिक डायल आर्ट

क्लासिक डायल-आर्ट टाइमलेस अपीलसह सुरेखपणा प्रदान करते

पूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर

नवीन TVS Jupiter ZX मध्ये आहे डिजिटल ॲनालॉग स्पीडोमीटर, जो दोघांचा सर्वोत्तम अनुभव देतो

रिच चॉकलेट ब्राऊन पॅनेल्स

TVS Jupiter मध्ये प्रीमियम रिच चॉकलेट ब्राऊन पॅनेल्स सह अनोखे कलर्स आहेत, ज्यामुळे तुमच्या स्कूटरला अनोखी पर्सनॅलिटी लाभते, ज्यातून तिचे शक्तिशाली अस्तित्व नजरेत भरते. फक्त ज्युपिटर मध्येच उपलब्ध

प्रिमियम पॅटर्न लेदर सीट्स, पिलिअन बॅकरेस्ट सह

प्रीमियम पॅटर्न लेदर सीट ओव्हरऑल क्लासिक अपीलला आणखी उत्तम बनवते

जास्त आराम

लार्जेस्ट लेग स्पेस (375 mm)

या स्कूटरचा प्रत्येक भाग अत्यंत काटेकोरपणे आणि लक्झरी घटकांनी बनवलेला आहे, की रायडर आणि पिलियन दोघांनाही स्वतःची खास जागा मिळवून देतात. TVS Jupiter मध्ये सर्व स्कूटर्सपेक्षा सर्वात मोठी लेग स्पेस (375mm) आहे. आरामात चालवा आणि अधिक स्टोअर करा

फ्रंट टेलिस्कोपिक सस्पेंशन

एखाद्या वाहनाची पारख ही त्याच्या राइडमधील चपळता आणि सुरळितपणा ह्यावरून केली जात असते. TVS Jupiter मध्ये पुढच्या बाजूला आधुनिक टेलिस्कोपिक शॉक ॲब्सॉर्बर्स आहेत. त्यामुळे खाचखळग्यांच्या किंवा खराब रस्त्यांवर जाताना अधिक चांगला आणि हळुवार कुशनिंग इफेक्ट लाभतो

3 स्टेप ऍडजस्टेबल रिअर सस्पेंशन

TVS Jupiter मध्ये मागच्या बाजूला गॅस चार्ज्ड शॉक ॲब्सॉर्बर्स आहेत, जे विशेषतः ओबडधोबड रस्त्यांवर लागणारे अगदी लहानात लहान धक्के कमी करण्यासाठी डिझाइन केले गेले आहेत. गॅसने भरलेले रीअर शॉक ॲब्सॉर्बर्स तुम्हाला आणि तुमच्या पाठी बसलेल्या व्यक्तीला उत्कृष्ट सीटिंग कम्फर्ट प्रदान करतात आणि उंचसखल रस्त्यांवर राइक करताना देखील तुमच्या पाठीला आणि खांद्यांना इजा होण्यापासून वाचवतात

मोठे 90/90-12 ट्यूबलेस टायर्स

तुमची स्कूटर आणि रस्ता ह्यांच्यामध्ये एक परस्पर संबंध असतो. टिकाऊ, स्टायलिश आणि वजनाला हलकी ऑल ब्लॅक अलॉय व्हील्स. रस्त्यावर उत्कृष्ट ग्रिप. गंजण्यापासूनही मुक्त. ट्युबलेस टायर्समुळे तुम्ही दूरवरच्या प्रवासामध्ये टेन्शन फ्री

लीस्ट टर्निंग रेडियस

प्रत्यक्षात तुम्ही वेळेवर पोहोचण्यासाठी दाटीवाटीच्या वळणावर विसंबून राहू शकत नाही. पण 1910mm एवढी कमी टर्निंग रेडियस सोबत, TVS Jupiter तुम्हाला देते झपाट्याने पुढे जाण्याची आणि संबंधित श्रेणीतील अग्रगण्य राहायची सहजता (* प्रतिमा केवळ दर्शवणे हेतुकरिता)

लार्जेस्ट व्हील बेस

व्हील बेस मोठा असल्यामुळे अधिक चांगली स्थिरता लाभते. एक ट्रान्सवर्सली माउंटेड इंजिन आणि 1275 mm चा सर्वात विशाल व्हील बेस ह्यामुळे TVS Jupiter भारतातील सर्व भूप्रदेशांमध्ये देते एका लक्झरी स्कूटरचे एक्स्ट्राऑर्डिनरी रायडिंग

TVS Jupiter ZX accessible kick start

ॲक्सेसिबल किक स्टार्ट आणि इलेक्ट्रिक स्टार्ट

TVS Jupiter मध्ये एक इलेक्ट्रिक स्टार्टर आहे. तेव्हा अगदी निवांत राहा आणि स्कूटर कुठेही, कधीही स्टार्ट करा. तसेच किक-स्टार्टची लेवल आदर्श, म्हणजेच तुमच्या पायाच्या जवळ आहे, ज्यामुळे तुम्ही सीटवरून खाली न उतरताच स्कूटर स्टार्ट करू शकता

कंफर्टेबल ग्रिप्स

लक्झरी आहे ऐषारामाचे दुसरे नाव. TVS Jupiter मध्ये संपर्काच्या जागांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. फील करा, एंजॉय करा आणि आगेकूच करा तुमच्या इच्छित ठिकाणाकडे

प्रिमियम कुशन्ड बॅकरेस्ट

कुशन्ड बॅकरेस्ट युक्त क्लासी क्रोम पिलियन हँडल

जास्त सुविधा

TVS intelliGO

TVS intelliGO सिग्नल व इतर क्षणिक थांबा वर इंजिन बंद करते ज्यामुळे होते इंधनची बचत I पुन्हा सुरु करताना फक्त ब्रेक दाबून गती वाढवणे आणि इंजिन पुन्हा सुरु I ह्या मुळे इंधन ची बचत होते ।

TVS Jupiter ZX Centre Stand

E-Z® सेन्टर स्टॅन्ड

TVS Jupiter च्या पेटंटेड E-Z® सेंटर स्टॅन्डमुळे तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कुणालाही स्कूटर तिच्या सेंटर स्टँड वर अगदी सहज ढकलून पार्क करणे शक्य होते

बाहेरुन इंधन भरण्याची सुविधा

TVS Jupiter चा एक्स्टर्नल फ्युअल फिल तुम्हाला तुमच्या सीटवरून न उठता देखील पेट्रोल भरू देतो. विशेषत: तुम्ही जेव्हा सीटच्या खालच्या जागेत काही मौल्यवान गोष्टी ठेवलेल्या असतात तेव्हा हे फारच सुरक्षेचे ठरते. तसेच तुमच्याकडे असलेल्या ताज्या खाद्य पदार्थांवर पेट्रोलचे शिंतोडे उडण्यापासून किंवा पेट्रोलचा खराब वासापासून सुरक्षित ठेवते

लो फ्युअल अलर्ट

वेळेवर आणि तुमच्या सोयीनुसार फ्युअल भरा. तुमच्या स्कूटर मधील फ्युअलची पातळी जेव्हा खाली जाते, तेव्हा तुमच्या TVS Jupiter मध्ये पुन्हा फ्युअल भरण्यासाठी लो फ्युअल इंडिकेटर तुम्हाला सावध करतो. ही स्मार्ट इशारा तंत्र तुमच्या स्कूटरमध्ये पुन्हा फ्युअल कधी भरावे अशा लहानसहान गोष्टींच्या काळजीपासून दूर ठेवते

मोबाइल चार्जरची सुविधा

स्विच्ड ऑन रहा. TVS Jupiter मध्ये मोबाइल चार्जरची सुविधा आहे. निश्चिन्तपणे दूरवर जा आणि सदैव तुमच्या जीवलगांच्या संपर्कात रहा

फ्रंट युटिलिटी बॉक्स

2 लिटर फ्रंट युटिलिटी बॉक्स जो स्टोरेजसाठी अतिरिक्त जागा आणि अनुकूलता पुरवतो

लार्ज अंडर-सीट स्टोरेज

पूर्णपणी वापर करता येणाऱ्या 21 लिटर्स स्टोरेज स्पेसमुळे वेगवेगळ्या आकारमानाचे सामान ठेवता येते आणि स्टोरेज क्षमता कमाल सत्कारणी लावता येते, ज्यामुळे स्टोरेजची क्षमता जराही वाया जात नाही. तुमचे सामान आणि फुल फेस हेल्मेट देखील सोयीस्करपणे आणि सुरक्षित सामावले जाते

TVS JupiterRetractable Bag Hooks Dual bag hooks

रीट्रॅक्टेबल बॅग हूक्स

TVS Jupiter मधील रीट्रॅक्टेबल बॅग हूक्स तुमच्या पायांना कधीही इजा होऊ देत नाहीत. तुम्हाला तुमच्या बॅग्ज ठेवणे गरजेचे असेल तेव्हा बाहेर ओढा. हे तुमचे सामान ठेण्यासाठी अधिक जागाही देतात

ऑल-इन-वन लॉक

ऑल-इन-वन लॉकमुळे ग्राहकांना इग्निशन, हँडल लॉक, सीट लॉक आणि फ्युअल टॅंक कॅप हे सर्व फक्त एका सिंगल की-होलसोबत कार्यान्वित करणे शक्य होते

i-TOUCHstart

इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर टेक्नोलॉजीने सुसज्ज आय-टच स्टार्टमुळे (i-TOUCHstart) तुमचे वाहन त्वरित आणि शांतपणे सुरू होण्यास मदत होते, बॅटरीच्या आयुर्मानामध्ये वाढ होते आणि स्टॉप-गो प्रकारच्या स्थितींमध्ये 'स्टार्ट रिलायबिलिटी' मध्ये सुधारणा होते

जास्त सुरक्षा

मॅलफंक्शन इंडिकेटर लॅम्प (एमआयएल)

मॅलफंक्शन इंडिकेटर लॅम्प, तुमच्या वाहनामध्ये कोणतीही समस्या आढळल्यास तुम्हाला अलर्ट करतो आणि सुनिश्चित करतो की तुमच्या वाहनाची कामगिरी उत्तम राहील आणि देखभालीचा खर्च कमी होईल

मेटल बॉडी

सांगाडा भक्कम असतो तेव्हा मिळते मजबुती आणि लवचीकता. ह्या गाडीची मजबूत चॅसीस चपळ संचालनासाठी भक्कम आधाराची तरतूद करते आणि हिची अल्ट्रा स्ट्रेंग्थ शीट मेटल बॉडी टेन्शनची कोणतीही शक्यता राहू देत नाही

युनिक पास-बाय स्विच

TVS Jupiter सादर करत आहे युनिक पास-बाय स्विच. स्कूटर्समध्ये प्रथमच. ह्यामुळे तुम्हाला हायवेज वर किंवा नो हॉर्न क्षेत्रांमध्ये ओव्हरटेक करणे खात्रीने सोपे आणि सुरक्षित ठरते

TVS Jupiter Classic LED Headlamp

LED हेड लॅम्प

अप्रतिम स्टाइलसह LED हेड लॅम्प तुम्हाला देतात उत्कृष्ट प्रकाश, ज्यामुळे तुम्हाला मिळते उत्तम व्हिजिबिलिटी आणि जास्त सुरक्षा

पार्किंग ब्रेक

तुमच्या TVS Jupiter ला ओबडधोबड किंवा उताराच्या पृष्ठभागांवर आरामात पार्क करा. TVS Jupiter मधील पार्किंग ब्रेक हा कार्स मधील हॅन्ड ब्रेकसारखे काम करतो आणि तुमचे वाहन जागच्या जागी स्थिर ठेवतो

डिस्क ब्रेक

एसबीटीयुक्त डिस्क ब्रेक- एसबीटीने युक्त डिस्क ब्रेकमुळे (सिन्क्रोनाइज्ड ब्रेकिंग टेक्नोलॉजी) राइडिंगच्या सर्व स्थितींमध्ये सुरक्षित ब्रेकिंगची खातरजमा होते

YOU MAY ALSO LIKE

TVS Ntorq
TVS Scooty Pep+
TVS iQube